सोमवार, 5 दिसंबर 2022

डॉ. आंबेडकर यांनी संविधान लिहले असे का म्हणतात?

 डॉ.आंबेडकर अर्थातच संविधानाचे जनक मानले जातात आणि ते मानले जातीलच याचा अर्थ संपूर्ण संविधान लिहून काढले असा त्याचा अर्थ होत नाही, संविधान बनविण्यासाठी संविधान सभा तयार करण्यात आली होती आणि त्यात ३४९ जण होते, अर्थात हे ३४९ लोक विद्वान, उच्चशिक्षित आणि सर्व जाती-धर्माचे प्रतिनिधित्व करणारी होती, मात्र त्यातील २९९ लोक राहिले आणि त्यांनी एकूण 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवसांंमध्ये 114 दिवस वाद-विवाद (म्हणजे डिबेट - आत्ता करतात तशी नव्हे), आणि एकूण 12 अधिवेशन केले त्यात 284 सदस्यांनी हस्ताक्षर देखील केले तसेच संविधान बनविण्यासाठी 166 दिवस बैठक केली गेली यात प्रेस आणि जनतेला भाग घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते तसेच आधीच अधिनियमित केले गेलेले आहेत अश्या ६० देशांच्या घटना मासुद्यांचा अभ्यास करण्यात आला (कॉपी नव्हे) (जसे तुम्हाला एखादे घर कसे बांधावे याविषयी माहिती नसते तेव्हा इतर लोकांनी घरे कशी बांधली आहेत हे आपण पाहता, अगदी तसे). मात्र ३४९ जणांच्या समोर एक एक मसुदा डॉ.आंबेडकर ३ वेळा सादर करीत असत आणि त्यावर विद्वानांचे मत, लॉजिक, भविष्यातील शक्यता, इतर जाती-धर्मातील प्रतिनिधींच्या हरकती इत्यादी बाबींवर सखोल चर्चा करून अंतिम मसुदा अध्यक्ष महोदयांसमोर सादर करून तो अंतिम मत मोजणी होऊन मंजूर केला जात असे. कित्येक दिवस आणि रात्र काम चालू होते. असे फक्त त्यावेळेसच शक्य होते, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण त्या काळात अनेक ज्ञान पिपासू व्यक्तिमत्व होते जे जातीभेद आणि धर्मभेद न करता निव्वळ बौद्धिक कसोटी आणि इतरांची मते यावर आधारित संविधानाचा मसुदा तयार करत होती. जे आजच्या नव्हे तर पुढील १०० वर्षात देखील होणे शक्य नाही.

इतिहास साक्ष आहे कि डॉ.भीमराव आंबेडकर यांनी 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवसांंमध्ये जी मेहनत आणि जे कष्ट घेतले ते इतर कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या व्यक्तीचे काम नाही, किंबहुना डॉ.बेनेगल राव हे सल्लागार होते आणि यांनी कच्चा मसुदा (संविधानाचे प्रथम प्रारूप) तयार केला यात कोणतीही शंका नसावी, परंतु पक्का मसुदा डॉ.भीमराव आंबेडकर यांनीच केला त्यामुळे संपूर्ण श्रेय त्यांनाच दिले जाते. कारण डॉ.भीमराव आंबेडकर एक असे व्यक्तिमत्व होते कि जर ते नसते तर संविधान बनविण्याचे काम कोणी हातात घेतले नसते आणि जरी कोणी हाती घेतले असते तरी जे काम त्यांनी केले नसते व ते कोणीही करू शकले नसते हे सर्वमान्य आहे आणि सूर्यसत्त्य आहे, बाकी आपण सुज्ञ आहात.