सोमवार, 15 जुलाई 2019

मळण लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट फिल्म दिग्दर्शक पुरस्कार ॲड. माने यांना जाहीर

मळण लघुपटासाठी  सर्वोत्कृष्ट फिल्म दिग्दर्शक पुरस्कार  ॲड. माने यांना जाहीर

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन द्वारा आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सव 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक हा पुरस्कार ॲड. चारुशील माने यांच्या मळण या लघुचित्रपटाला जाहीर झाला आहे.

या पूर्वी मळण लघुचित्रपटाला मुंबई येथील कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय लघुपट म्हणून नामांकन जाहीर झाले होते.
जुलै महिण्यात आयोजित केलेल्या नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यात या पुरस्काराचे वितरण भव्य सोहळ्यात होणार आहे.

ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन त्यांच्यातील अभिनयाला वाव दिल्याने तसेच कोणत्याही कलाकाराने अभिनयाचे प्रशिक्षण न घेता त्यांच्याकडून अभिनय करून घेऊन त्यांच्या कलागुणांना संधी दिल्याबद्दल सर्वच स्तरातून ॲडव्होकेट माने यांचे स्वागत होत आहे. या लघु चित्रपटाचे चित्रीकरण पांगरी, खरबी, बळसोंड, दाटेगाव, हिंगोली या ठिकाणी झाले होते. पांगरी येथील गावकऱ्यांनी यात मोलाचे सहकार्य केले व लघुचित्रपटात भूमिका देखील केल्या. काही कलावंत अशिक्षित होते. या लघुचित्रपटात मौजे इंचा येथील गुरुदास कामत माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकत असताना संचिता कर्डीले हिने बालकलावंत म्हणून भूमिका केली आहे.

रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन तर्फे गणेश रहिकवार महोत्सव दिग्दर्शक व चित्रपट दिग्दर्शक यांनी पुरस्कार घोषित केल्याचे कळविले आहे, या पुरस्कारात  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात माने यांना देण्यात येणार आहे. पुढील व चालू लघु व मोठ्या चित्रपटात शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना अभिनयाची संधी देऊन चित्रपट सृष्टीत त्यांना आणण्याचा मानस ॲडव्होकेट माने यांनी व्यक्त केला. ॲड. माने यांनी मळणच्या सर्व टीमला यशाचे श्रेय दिले आहे. यात बहुतकरून सर्व नवीन कलाकार होते. ॲड. माने यांचे लागोपाठ त्यांच्या दोन लघुपटांना प्रत्येकी एक पुरस्कार प्राप्त झाल्याने ॲडव्होकेट माने यांचे सर्वत्र कौतुक आहे. याबाबत क्लूआर्ट म्यूझिक अँड मुव्हीज कंपनीच्या संचालिका पुनम माने यांनी कळविले आहे.




गुरु शिष्य आणि बुद्ध

 एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहे, जगातील सर्वप्रथम जन्मलेल्या व्यक्तीचा गुरू कोण? धर्म निर्मात्यांचा गुरू कोण?

धर्म असेल तेथे गुरु-शिष्य परंपरा येऊ शकते.
पण मुळात जिथे धर्म नाही त्याठिकाणी गुरु-शिष्य परंपरा तयार होऊ शकत नाही, कारण गुरु शिष्य परंपरा वरिष्ठ आणि कनिष्ठ पदाची निर्मिती करते.
लोकांनी मग बुद्धाचे गुरु शोधून काढले असते आणि बुद्ध पेक्षा श्रेष्ठ त्या गुरूंना मानलं असतं. गुरु-शिष्य परंपरेत शिष्याला गुरुची प्रत्येक गोष्ट मान्यच करावी लागते व त्याविरुद्ध तो प्रतिप्रश्न किंवा वेगळी बाजू मांडू शकत नाही. म्हणून भिक्षु संघामध्ये देखील गुरु आणि शिष्य नसतात. तथागत बुद्धाने देखील स्वतः ला कधी गुरु किंवा महागुरू मानून घेतले नाही.
गुरु शिष्य परंपरा काळाच्या ओघात विज्ञाना समोर कालबाह्य ठरली आहे. पूर्वीच्या काळात गुरु हा केवळ एक धंद्याचा प्रकार होता व शिष्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात किंवा डावपेच आखून त्या पूर्ण केल्या जायच्या त्यातून शिष्य गुरु वर खुश होऊन त्या शिष्य जवळ असली नसली सर्व संपत्ती तो शिष्य उधळून टाकायचा.

तुमच्या मनाला पटत नसेल तर ते मी सांगितलेच नाही, असे समजावे, अशी बुद्धाची शिकवण तसेच विज्ञानाच्या काळात मी सांगितलेल्या गोष्टी योग्य ठरत नसतील तर त्यातही बदल करावा, ही बुद्धाची शिकवण या परंपरेला तडा देते.
जन्मजात मुलांचा खरा गुरू त्याचे पालक असतात परंतु मुलगा मुलगी कधीही पालकांना गुरु मानत नाही. गुरु-शिष्य परंपरेत  शिष्याला  एकच गुरू असतो व त्या गुरुचे सार्वभौमत्व असते  त्या गुरुला सोडून इतर कोणालाही श्रेष्ठ मानत नाही  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 3 गुरू होते. संत कबीर मुस्लिम धर्मीय होते. परंतु धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म निवडला. आधुनिक काळातला सर्वात मोठा लोकांचा गुरु हा गुगल आहे.
-चारुशील माने