रक्षाबंधन / भिक्षाबंधन
कसलं हे रक्षेचं बंधन
जबरदस्तीचं भिक्षाबंधन
ना दिला संपत्तीचा समान हक्क
स्त्रीला हजारो वर्ष संस्कृतीनं
भावा - बहिणीला चंदन
व्यापाराचं भरतं आंगण
५१ मिनिटाला देशात बलात्कार
बेगडी हे नात्याचं बंधन
केले लाखो बहीणींचे पोटी खून
कसे विसरू बुधवार पेठेतील बहिणींचे नर्तन
व्यर्थ आहे हे शरीरावरचं गोंदण
देत नाहीत लाखों बहीणींना शिक्षण
आजही येलम्माच्या देवदासीला
भाग आहे वेश्येचं जीवन जगणं
आज तर " चारागर" नातंच झालं भग्न
बहिण तर बनलं संपत्तीचं विघ्नं…
रक्षाबंधन - भिक्षाबंधन !!
- चारुशील माने (चारागर)
कसलं हे रक्षेचं बंधन
जबरदस्तीचं भिक्षाबंधन
ना दिला संपत्तीचा समान हक्क
स्त्रीला हजारो वर्ष संस्कृतीनं
भावा - बहिणीला चंदन
व्यापाराचं भरतं आंगण
५१ मिनिटाला देशात बलात्कार
बेगडी हे नात्याचं बंधन
केले लाखो बहीणींचे पोटी खून
कसे विसरू बुधवार पेठेतील बहिणींचे नर्तन
व्यर्थ आहे हे शरीरावरचं गोंदण
देत नाहीत लाखों बहीणींना शिक्षण
आजही येलम्माच्या देवदासीला
भाग आहे वेश्येचं जीवन जगणं
आज तर " चारागर" नातंच झालं भग्न
बहिण तर बनलं संपत्तीचं विघ्नं…
रक्षाबंधन - भिक्षाबंधन !!
- चारुशील माने (चारागर)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें