सोमवार, 27 जुलाई 2020

इंग्लंड मध्य माझी शॉर्ट फिल्म 1 आठवडा ऑनलाईन झाली आहे, शक्य झाले तर वोट करा....🙏 Pls vote my film at Sr. NO. 46 THE BROTHELS & TRANSPORTERS

इंग्लंड मध्य माझी शॉर्ट फिल्म 1 आठवडा ऑनलाईन झाली आहे, 
शक्य झाले तर वोट करा....🙏
Pls vote my film at Sr. NO. 46 THE BROTHELS & TRANSPORTERS

First-Time Filmmaker Sessions July 2020 is now live to the public and accepting votes!

Vimeo.com/ondemand/ftsessionsjuly20205

First open account in Vimeo (in browser or app- Download Vimeo App 
Or search Vimeo on browser.

https://play.google.com/store/apps/details?id=com.vimeo.android.videoapp) 

Then you have to rent  $10 to watch collection 105 films

1. Write first - Voted in comment box.

2. Then, write 2 films name.

3. Then, write comment on https://liftoff.network/voting-system-ftsessju20205/

#LiftOffGlobalNetwork
#LiftOffFilmFestivals  
#LiftOffSessions
#FirstTimeFilmmakerSessions #FirstTimeFilmmakerSessionsJuly #SupportIndieFilm

रविवार, 26 जुलाई 2020

Jo bhi mili raten gazab roshan - Charusheel Mane

जो भी मिली रातें गज़ब रोशन - चारुशील माने

यह ग़ज़ल "प्यास हो के भी" इस ग़ज़ल अल्बम से है! यूट्यूब पर उपलब्ध है !!
जरूर सुने !!
Jo bhi mili raten gazab roshan - Charusheel Mane
https://youtu.be/spAuGBZiBNs

शनिवार, 25 जुलाई 2020

Charusheel Mane Youtube Channel link

Charusheel Mane official youtube channel from Youtube 
चारुशील माने यूट्यूब चॅनेल लिंक - https://www.youtube.com/channel/UCv7hD3g3xpBULLFPct_RHlQ

शुक्रवार, 24 जुलाई 2020

चारुशील माने यांच्या दोन चित्रपटाची इंग्लंडमध्ये निवड - फॉर सेल ची दुसऱ्यांदा आणि दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स ची निवड

ॲड. माने यांच्या दोन चित्रपटाची इंग्लंडमध्ये निवड - फॉर सेल ची दुसऱ्यांदा आणि दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स ची निवड


हिंगोली - सामाजिक समस्या लघुचित्रपटाचा मुख्य उद्देश असतो. या साठी शासन मदत देखील करते. पण लाल फितीच्या गुलदस्त्यात अडकून राहण्यापेक्षा स्वतःच्या खर्चाने तीन लघुचित्रपट लेखक, दिग्दर्शक ॲड. माने यांनी बनविले. काही दिवसापूर्वी फॉर सेल या लघु चित्रपटाची निवड द लिफ्ट ऑफ सेशन इंग्लंड येथे झाली होती. त्यानंतर इंग्लंड येथील दुसरा फेस्टिवल फर्स्ट-टाइम फिल्ममेकर सेशन्स या फिल्म फेस्टिवल साठी आता फॉर सेल आणि द ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स या दोन्ही लघु चित्रपटाची निवड झाली आहे. तशा प्रकारचा अभिनंदन करणारा ई-मेल पाठवून  आयव्हर  इंग्लंड येथील फर्स्ट-टाइम फिल्म मेकर सेशन्स,  या फिल्म फेस्टिवलचे संचालक क्लेअर रिचर्डसन यांनी कळवले आहे. सदर लघु चित्रपटाची निवड झाल्यानंतर सदरचा लघु चित्रपट पुढील स्पर्धेसाठी सामील केल्या जातो. तसेच त्यासाठी काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे बक्षिसे देखील त्यात समाविष्ट असतात. त्यापैकी लिफ्ट प्रोडक्शन सपोर्ट पॅकेज हा 75000 डॉलर्स किंमतीचा पॅकेजचे ॲप्लीकेशन तसेच विजेत्या लघु चित्रपटाची  रॅले स्टुडिओज, हॉलिवूड,  लॉस एंजेलिस, अमेरिका येथे  निवड होऊन तेथे सदरचा लघुचित्रपट प्रदर्शित केल्या जातो. व इतर बक्षिसांचा समावेश असतो. 
सदर फॉर सेल लघु चित्रपटाचे चित्रीकरण हे हिंगोली शहर परिसरात, रेल्वे स्टेशन, सम्राट अशोक नगर भागात व चित्रपटाचे डबिंग, एडिटिंग व व्हिडिओ एडिटिंग हे क्लूआर्ट म्युझिक अँड मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेड शिवाजीनगर हिंगोली या स्टुडिओ मध्ये झाले आहे. या लघु चित्रपटामध्ये एक रॅप गाणे देखील याच स्टुडीओमध्ये तयार करून टाकण्यात आले आहे. सदर गाणे हे - "ए गर्ल फॉर सेल" या नावाने ॲप्पल आयट्युन्स, अमेझॉन, जिओसावन इत्यादी स्टोअर वर ऑनलाइन रिलीज करण्यात आले असून सदर रॅप गाणे ॲड. चारुशील माने यांनी लिहिले व गायले आहे. त्यांचे नवीन रॅप "बॉलिवूड नेपोटीझम" हे गाणे ॲड. माने यांच्या "रिव्हेंजर" या उर्फ नावावरून लवकरच रिलीज होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पूर्वी सहा रॅप, संविधान रॅप, मिलेनियर बनण्याचा इरादा कर तू पक्का, कामगार हूं, इत्यादी रॅप गाणी लॉकडॉऊन च्या काळात  रॅप श्रोत्यांसाठी सादर केली आहेत.
द ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स या चित्रपटास यापूर्वी सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

त्यामुळे पूर्वी निवड झालेला एक आणि आता दोन चित्रपटांची निवड इंग्लड येथे झाल्यामुळे  ॲड. चारुशील माने व सर्व कलाकार मंडळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

For Sale Directed by Charusheel Mane Is officially selected in Kolkata Online International Film Festival 2020 (already selected in 2 festivals of #England #UK इंग्लड मध्ये 2 फेस्टिवल निवड झालेला फॉर सेल चित्रपट कोलकाता ऑनलाईन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2020 साठी निवड झाली आहे !!

Congratulations ! Team - https://www.facebook.com/shortfilmforsale/ @for_sale.short.film For Sale Directed by me
Is officially selected in Kolkata Online International Film Festival 2020 (already selected in 2 festivals of #England #UK

इंग्लड मध्ये 2 फेस्टिवल निवड झालेला फॉर सेल चित्रपट कोलकाता ऑनलाईन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2020 साठी निवड झाली आहे !!!

सोमवार, 24 फ़रवरी 2020

प्रेसिडेंट ट्रम्प
प्रेसिडेंट ट्रम्प तुम्ही आलेच आहात दिल्लीमध्ये हॅपिनेस क्लाससाठी जा केजरीवालांच्या शाळेमध्ये जा तिथलं विद्दयेचं सौंर्य पहा..
पहा तिथलं आधुनिक शिक्षण...

पण चुकूनही जाऊ नका जेएनयु युनिव्हर्सिटीकडे.. कारण तिथे तुम्हाला भेटतील काठ्यांचे उमटलेले ताजे वळ आणि शिक्षण घेत असताना अत्याचार सहन करणारे निष्पाप विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणूनच म्हणत आहे प्रेसिडेंट ट्रम्प जाऊ नका तिकडे...

प्रेसिडेंट ट्रम्प, अहमदाबादला गेले तर, पहा तिथला विकास... वाजवा मोदीजींचे विकास गाणे, चकाकणाऱ्या रस्त्यांचीही मन भरून करा स्तुति... आणि भिंतीद्वारे देश गरिबीतून बाहेर पडतोय, असंच म्हणा...
पण भिंतीच्या पलीकडे काय आहे हे चूकूनही पाहू नका... त्या भिंतीच्या पलीकडे आहे ...अठराविश्व दारिद्र्य साध्या शौचालयची सोय नसलेली घरं... आणि भीक मागणारी निरागस मुलं... त्यांच्या घरात चूकूनही डोकावून पाहू नका,
कारण संध्याकाळी खाण्यासाठी मीठ मिरची ही त्यांच्या टोपल्यात नसेल.. म्हणून म्हणतो प्रेसिडेंट जाऊ नका तिकडे

आणि हो प्रेसिडेंट ट्रम्प ! शाहीन बागचा तर पत्ता देखील विचारू नका ! ईव्हीएम, सीएए, एनआरसी, एनपीआर चा चकार उल्लेख ही करू नका... नाही तर तुम्हाला ही देशद्रोही ठरवतील !!  कारण स्वार्थाच्या जंगलात रातोरात जनविरोधी कायदे पास होतात इथे !!
म्हणून म्हणतो प्रेसिडेंट जाऊ नका तिकडे...

बुधवार, 15 जनवरी 2020

Samvidhan Rap Song
🎼🎼🎼
संविधान रैप गाना ज़रूर सुनिये
🎵🎵
Link -
https://youtu.be/GLh4z2LADa8

सोमवार, 15 जुलाई 2019

मळण लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट फिल्म दिग्दर्शक पुरस्कार ॲड. माने यांना जाहीर

मळण लघुपटासाठी  सर्वोत्कृष्ट फिल्म दिग्दर्शक पुरस्कार  ॲड. माने यांना जाहीर

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन द्वारा आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सव 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक हा पुरस्कार ॲड. चारुशील माने यांच्या मळण या लघुचित्रपटाला जाहीर झाला आहे.

या पूर्वी मळण लघुचित्रपटाला मुंबई येथील कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय लघुपट म्हणून नामांकन जाहीर झाले होते.
जुलै महिण्यात आयोजित केलेल्या नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यात या पुरस्काराचे वितरण भव्य सोहळ्यात होणार आहे.

ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन त्यांच्यातील अभिनयाला वाव दिल्याने तसेच कोणत्याही कलाकाराने अभिनयाचे प्रशिक्षण न घेता त्यांच्याकडून अभिनय करून घेऊन त्यांच्या कलागुणांना संधी दिल्याबद्दल सर्वच स्तरातून ॲडव्होकेट माने यांचे स्वागत होत आहे. या लघु चित्रपटाचे चित्रीकरण पांगरी, खरबी, बळसोंड, दाटेगाव, हिंगोली या ठिकाणी झाले होते. पांगरी येथील गावकऱ्यांनी यात मोलाचे सहकार्य केले व लघुचित्रपटात भूमिका देखील केल्या. काही कलावंत अशिक्षित होते. या लघुचित्रपटात मौजे इंचा येथील गुरुदास कामत माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकत असताना संचिता कर्डीले हिने बालकलावंत म्हणून भूमिका केली आहे.

रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन तर्फे गणेश रहिकवार महोत्सव दिग्दर्शक व चित्रपट दिग्दर्शक यांनी पुरस्कार घोषित केल्याचे कळविले आहे, या पुरस्कारात  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात माने यांना देण्यात येणार आहे. पुढील व चालू लघु व मोठ्या चित्रपटात शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना अभिनयाची संधी देऊन चित्रपट सृष्टीत त्यांना आणण्याचा मानस ॲडव्होकेट माने यांनी व्यक्त केला. ॲड. माने यांनी मळणच्या सर्व टीमला यशाचे श्रेय दिले आहे. यात बहुतकरून सर्व नवीन कलाकार होते. ॲड. माने यांचे लागोपाठ त्यांच्या दोन लघुपटांना प्रत्येकी एक पुरस्कार प्राप्त झाल्याने ॲडव्होकेट माने यांचे सर्वत्र कौतुक आहे. याबाबत क्लूआर्ट म्यूझिक अँड मुव्हीज कंपनीच्या संचालिका पुनम माने यांनी कळविले आहे.




गुरु शिष्य आणि बुद्ध

 एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहे, जगातील सर्वप्रथम जन्मलेल्या व्यक्तीचा गुरू कोण? धर्म निर्मात्यांचा गुरू कोण?

धर्म असेल तेथे गुरु-शिष्य परंपरा येऊ शकते.
पण मुळात जिथे धर्म नाही त्याठिकाणी गुरु-शिष्य परंपरा तयार होऊ शकत नाही, कारण गुरु शिष्य परंपरा वरिष्ठ आणि कनिष्ठ पदाची निर्मिती करते.
लोकांनी मग बुद्धाचे गुरु शोधून काढले असते आणि बुद्ध पेक्षा श्रेष्ठ त्या गुरूंना मानलं असतं. गुरु-शिष्य परंपरेत शिष्याला गुरुची प्रत्येक गोष्ट मान्यच करावी लागते व त्याविरुद्ध तो प्रतिप्रश्न किंवा वेगळी बाजू मांडू शकत नाही. म्हणून भिक्षु संघामध्ये देखील गुरु आणि शिष्य नसतात. तथागत बुद्धाने देखील स्वतः ला कधी गुरु किंवा महागुरू मानून घेतले नाही.
गुरु शिष्य परंपरा काळाच्या ओघात विज्ञाना समोर कालबाह्य ठरली आहे. पूर्वीच्या काळात गुरु हा केवळ एक धंद्याचा प्रकार होता व शिष्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात किंवा डावपेच आखून त्या पूर्ण केल्या जायच्या त्यातून शिष्य गुरु वर खुश होऊन त्या शिष्य जवळ असली नसली सर्व संपत्ती तो शिष्य उधळून टाकायचा.

तुमच्या मनाला पटत नसेल तर ते मी सांगितलेच नाही, असे समजावे, अशी बुद्धाची शिकवण तसेच विज्ञानाच्या काळात मी सांगितलेल्या गोष्टी योग्य ठरत नसतील तर त्यातही बदल करावा, ही बुद्धाची शिकवण या परंपरेला तडा देते.
जन्मजात मुलांचा खरा गुरू त्याचे पालक असतात परंतु मुलगा मुलगी कधीही पालकांना गुरु मानत नाही. गुरु-शिष्य परंपरेत  शिष्याला  एकच गुरू असतो व त्या गुरुचे सार्वभौमत्व असते  त्या गुरुला सोडून इतर कोणालाही श्रेष्ठ मानत नाही  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 3 गुरू होते. संत कबीर मुस्लिम धर्मीय होते. परंतु धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म निवडला. आधुनिक काळातला सर्वात मोठा लोकांचा गुरु हा गुगल आहे.
-चारुशील माने

शुक्रवार, 14 जून 2019

मराठी शॉर्ट फिल्म *मळण* ची मुंबई येथील नावाजलेल्या *कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल* मध्ये निवड---
*आता आपणासाठी युट्युब वर उपलब्ध --* https://youtu.be/6B0rI6C50qg