सोमवार, 15 जुलाई 2019

गुरु शिष्य आणि बुद्ध

 एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहे, जगातील सर्वप्रथम जन्मलेल्या व्यक्तीचा गुरू कोण? धर्म निर्मात्यांचा गुरू कोण?

धर्म असेल तेथे गुरु-शिष्य परंपरा येऊ शकते.
पण मुळात जिथे धर्म नाही त्याठिकाणी गुरु-शिष्य परंपरा तयार होऊ शकत नाही, कारण गुरु शिष्य परंपरा वरिष्ठ आणि कनिष्ठ पदाची निर्मिती करते.
लोकांनी मग बुद्धाचे गुरु शोधून काढले असते आणि बुद्ध पेक्षा श्रेष्ठ त्या गुरूंना मानलं असतं. गुरु-शिष्य परंपरेत शिष्याला गुरुची प्रत्येक गोष्ट मान्यच करावी लागते व त्याविरुद्ध तो प्रतिप्रश्न किंवा वेगळी बाजू मांडू शकत नाही. म्हणून भिक्षु संघामध्ये देखील गुरु आणि शिष्य नसतात. तथागत बुद्धाने देखील स्वतः ला कधी गुरु किंवा महागुरू मानून घेतले नाही.
गुरु शिष्य परंपरा काळाच्या ओघात विज्ञाना समोर कालबाह्य ठरली आहे. पूर्वीच्या काळात गुरु हा केवळ एक धंद्याचा प्रकार होता व शिष्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात किंवा डावपेच आखून त्या पूर्ण केल्या जायच्या त्यातून शिष्य गुरु वर खुश होऊन त्या शिष्य जवळ असली नसली सर्व संपत्ती तो शिष्य उधळून टाकायचा.

तुमच्या मनाला पटत नसेल तर ते मी सांगितलेच नाही, असे समजावे, अशी बुद्धाची शिकवण तसेच विज्ञानाच्या काळात मी सांगितलेल्या गोष्टी योग्य ठरत नसतील तर त्यातही बदल करावा, ही बुद्धाची शिकवण या परंपरेला तडा देते.
जन्मजात मुलांचा खरा गुरू त्याचे पालक असतात परंतु मुलगा मुलगी कधीही पालकांना गुरु मानत नाही. गुरु-शिष्य परंपरेत  शिष्याला  एकच गुरू असतो व त्या गुरुचे सार्वभौमत्व असते  त्या गुरुला सोडून इतर कोणालाही श्रेष्ठ मानत नाही  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 3 गुरू होते. संत कबीर मुस्लिम धर्मीय होते. परंतु धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म निवडला. आधुनिक काळातला सर्वात मोठा लोकांचा गुरु हा गुगल आहे.
-चारुशील माने

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें