शुक्रवार, 24 जुलाई 2020

चारुशील माने यांच्या दोन चित्रपटाची इंग्लंडमध्ये निवड - फॉर सेल ची दुसऱ्यांदा आणि दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स ची निवड

ॲड. माने यांच्या दोन चित्रपटाची इंग्लंडमध्ये निवड - फॉर सेल ची दुसऱ्यांदा आणि दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स ची निवड


हिंगोली - सामाजिक समस्या लघुचित्रपटाचा मुख्य उद्देश असतो. या साठी शासन मदत देखील करते. पण लाल फितीच्या गुलदस्त्यात अडकून राहण्यापेक्षा स्वतःच्या खर्चाने तीन लघुचित्रपट लेखक, दिग्दर्शक ॲड. माने यांनी बनविले. काही दिवसापूर्वी फॉर सेल या लघु चित्रपटाची निवड द लिफ्ट ऑफ सेशन इंग्लंड येथे झाली होती. त्यानंतर इंग्लंड येथील दुसरा फेस्टिवल फर्स्ट-टाइम फिल्ममेकर सेशन्स या फिल्म फेस्टिवल साठी आता फॉर सेल आणि द ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स या दोन्ही लघु चित्रपटाची निवड झाली आहे. तशा प्रकारचा अभिनंदन करणारा ई-मेल पाठवून  आयव्हर  इंग्लंड येथील फर्स्ट-टाइम फिल्म मेकर सेशन्स,  या फिल्म फेस्टिवलचे संचालक क्लेअर रिचर्डसन यांनी कळवले आहे. सदर लघु चित्रपटाची निवड झाल्यानंतर सदरचा लघु चित्रपट पुढील स्पर्धेसाठी सामील केल्या जातो. तसेच त्यासाठी काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे बक्षिसे देखील त्यात समाविष्ट असतात. त्यापैकी लिफ्ट प्रोडक्शन सपोर्ट पॅकेज हा 75000 डॉलर्स किंमतीचा पॅकेजचे ॲप्लीकेशन तसेच विजेत्या लघु चित्रपटाची  रॅले स्टुडिओज, हॉलिवूड,  लॉस एंजेलिस, अमेरिका येथे  निवड होऊन तेथे सदरचा लघुचित्रपट प्रदर्शित केल्या जातो. व इतर बक्षिसांचा समावेश असतो. 
सदर फॉर सेल लघु चित्रपटाचे चित्रीकरण हे हिंगोली शहर परिसरात, रेल्वे स्टेशन, सम्राट अशोक नगर भागात व चित्रपटाचे डबिंग, एडिटिंग व व्हिडिओ एडिटिंग हे क्लूआर्ट म्युझिक अँड मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेड शिवाजीनगर हिंगोली या स्टुडिओ मध्ये झाले आहे. या लघु चित्रपटामध्ये एक रॅप गाणे देखील याच स्टुडीओमध्ये तयार करून टाकण्यात आले आहे. सदर गाणे हे - "ए गर्ल फॉर सेल" या नावाने ॲप्पल आयट्युन्स, अमेझॉन, जिओसावन इत्यादी स्टोअर वर ऑनलाइन रिलीज करण्यात आले असून सदर रॅप गाणे ॲड. चारुशील माने यांनी लिहिले व गायले आहे. त्यांचे नवीन रॅप "बॉलिवूड नेपोटीझम" हे गाणे ॲड. माने यांच्या "रिव्हेंजर" या उर्फ नावावरून लवकरच रिलीज होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पूर्वी सहा रॅप, संविधान रॅप, मिलेनियर बनण्याचा इरादा कर तू पक्का, कामगार हूं, इत्यादी रॅप गाणी लॉकडॉऊन च्या काळात  रॅप श्रोत्यांसाठी सादर केली आहेत.
द ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स या चित्रपटास यापूर्वी सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

त्यामुळे पूर्वी निवड झालेला एक आणि आता दोन चित्रपटांची निवड इंग्लड येथे झाल्यामुळे  ॲड. चारुशील माने व सर्व कलाकार मंडळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें