प्रेसिडेंट ट्रम्प
प्रेसिडेंट ट्रम्प तुम्ही आलेच आहात दिल्लीमध्ये हॅपिनेस क्लाससाठी जा केजरीवालांच्या शाळेमध्ये जा तिथलं विद्दयेचं सौंर्य पहा..
पहा तिथलं आधुनिक शिक्षण...
पण चुकूनही जाऊ नका जेएनयु युनिव्हर्सिटीकडे.. कारण तिथे तुम्हाला भेटतील काठ्यांचे उमटलेले ताजे वळ आणि शिक्षण घेत असताना अत्याचार सहन करणारे निष्पाप विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणूनच म्हणत आहे प्रेसिडेंट ट्रम्प जाऊ नका तिकडे...
प्रेसिडेंट ट्रम्प, अहमदाबादला गेले तर, पहा तिथला विकास... वाजवा मोदीजींचे विकास गाणे, चकाकणाऱ्या रस्त्यांचीही मन भरून करा स्तुति... आणि भिंतीद्वारे देश गरिबीतून बाहेर पडतोय, असंच म्हणा...
पण भिंतीच्या पलीकडे काय आहे हे चूकूनही पाहू नका... त्या भिंतीच्या पलीकडे आहे ...अठराविश्व दारिद्र्य साध्या शौचालयची सोय नसलेली घरं... आणि भीक मागणारी निरागस मुलं... त्यांच्या घरात चूकूनही डोकावून पाहू नका,
कारण संध्याकाळी खाण्यासाठी मीठ मिरची ही त्यांच्या टोपल्यात नसेल.. म्हणून म्हणतो प्रेसिडेंट जाऊ नका तिकडे
आणि हो प्रेसिडेंट ट्रम्प ! शाहीन बागचा तर पत्ता देखील विचारू नका ! ईव्हीएम, सीएए, एनआरसी, एनपीआर चा चकार उल्लेख ही करू नका... नाही तर तुम्हाला ही देशद्रोही ठरवतील !! कारण स्वार्थाच्या जंगलात रातोरात जनविरोधी कायदे पास होतात इथे !!
म्हणून म्हणतो प्रेसिडेंट जाऊ नका तिकडे...

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें