निफ २०१८ नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये मराठी गजल अल्बम सौंदर्याच्या खाणीचे प्रकाशन विदेशी कलाकाराच्या उपस्थितीत
दहा वर्षापासून दरवर्षी आयोजित केलेल्या चार दिवसीय नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे अँड.श्री.चारुशील माने यांच्या “सौंदर्याच्या खाणी” या मराठी गझल अल्बम चे प्रकाशन फिल्म फेस्टिव्हल चे संस्थापक संचालक मुकेश कनेरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रिया कणेरी, फ्रेंच कलाकार मरियन बोर्गो व चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसळकर-फाळके हे हजर होते.
यापूर्वी त्यांचे पाच ऑडीओ अल्बम यारा, पैसा, पटकुटी, रिश्ता, सोनोग्राफीची मशाल प्रकाशित झाले असून सोनोग्राफीची मशाल या अल्बमला प्रसार भारती ऑफ इंडिया व आल इंडिया रेडीओ यांनी आकाशवाणी प्रसारणाची मान्यता देखील दिली आहे व याच महोत्सवात त्यांचा “दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स” ची निवड झाल्याची बातमी आली होती त्यानंतर महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी देखील निवड झाली होती व महोत्सवात सदर लघुपट प्रदर्शित झाला.
“सौंदर्याच्या खाणी” या मराठी गझल अल्बम मध्ये एकूण आठ गझल असून त्यांनी सदर गझल स्वतः लिहून स्वरबद्ध करून गायिल्या देखील आहेत. ललिता वाव्हळ यांनी देखील काळजा घर पडून यातनानी रात सजली या गझलचे गायन केले आहे. या अल्बम मधील सर्व गझल ह्या क्ल्यूआर्ट मुसिक अँड मुव्हीज प्रा.लि. येथे ध्वनीमुद्रित झालेल्या आहेत. गझल रसिकांमध्ये या अल्बम बाबत कमालीची उत्सुकता आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें