गुरुवार, 17 मई 2018

दी ब्रोथेल्स अँड ट्रान्स्पोर्टर्स The brothels and Transporters

#भारतिय #नारी #सुरक्षित है क्या??


https://youtu.be/UFNeA8QlE4Q


*#असिफा , #निर्भया , #खैरलांजी ,* अश्या अनेक बलात्काराच्या घटना आपण दररोज पाहत असतो , या वर एक छोटासा उपाय असणारा हा अतिशय महत्वपूर्ण शॉर्ट फ़िल्म Nominated as #Best #Short #Film in 10th Nashik International Film Festival *"दी ब्रोथेल्स अँड ट्रान्स्पोर्टर्स"* फिल्म तुमच्या भेटीस आली आहे कशी वाटते यूट्यूब वर प्रतिक्रिया/कंमेंट लिहा... त्यासाठी सबक्राईब ला क्लिक करा. लाइक आणि बेल वर क्लिक करा करायला विसरू नका आणि बाकी मित्रांना पण पुढे पाठवा खालील लिंक ला क्लिक करा

https://youtu.be/UFNeA8QlE4Q


हा विडिओ जास्तीत जास्त शेयर करा आणि आपल्या माता भगिनींना नक्की दाखवा । *Dont miss Last 3min*...


Like share n subscribe our channel


भारत मे हर दिन 180 लडकीया (वेश्या बनाने?) भगायी जाती है, क्या है इस पे इलाज कौन बचा सकता है??

https://youtu.be/UFNeA8QlE4Q
प्लीज youtube वर कॉमेंट करा

शनिवार, 12 मई 2018

#मातृदिन #motherday #माँदिन #मातृदिवस
खोट्या शुभेच्छा !!!

#आई ही भारतात सुरक्षित आहे का???

https://youtu.be/UFNeA8QlE4Q

*#असिफा , #निर्भया , #खैरलांजी ,* अश्या अनेक बलात्काराच्या घटना आपण दररोज पाहत असतो , या वर एक छोटासा उपाय असणारा हा अतिशय महत्वपूर्ण शॉर्ट फ़िल्म Nominated as #Best #Short #Film in 10th Nashik International Film Festival *"दी ब्रोथेल्स अँड ट्रान्स्पोर्टर्स"* फिल्म तुमच्या भेटीस आली आहे कशी वाटते यूट्यूब वर प्रतिक्रिया/कंमेंट लिहा... त्यासाठी सबक्राईब ला क्लिक करा. लाइक आणि बेल वर क्लिक करा करायला विसरू नका आणि बाकी मित्रांना पण पुढे पाठवा खालील लिंक ला क्लिक करा
https://youtu.be/UFNeA8QlE4Q

हा विडिओ जास्तीत जास्त शेयर करा आणि आपल्या माता भगिनींना नक्की दाखवा । *Dont miss Last 3min*...

Like share n subscribe our channel

भारत मे हर दिन 180 लडकीया (वेश्या बनाने?) भगायी जाती है, क्या है इस पे इलाज कौन बचा सकता है??
https://youtu.be/UFNeA8QlE4Q

शनिवार, 21 अप्रैल 2018

महिला अत्याचार - मी ऐकूनच आहे

*मी ऐकूनच आहे

मागच्या शतकात, त्या मागच्या आणि त्या मागच्या शतकात हजारो वर्षापासुन मी ऐकूनच आहे
बालपणी इंग्रजीतले डैड असो कि मराठीतले बाबा,
मामा, काका, आजोबा, भावाचं ऐकूनच आहे.


कोणती शाळा कोणता अभ्यास कोणता पोशाख
कोणत्या मैत्रिणी कोणती परीक्षा कोणती नौकरी
कोण नवरा कोणतं सासर. कधी लग्न कधी गर्भपात कोणता देव कोणती पूजा साऱ्यात मी ऐकूनच आहे

लग्नानंतर सासरा, दीराचं ऐकून आहे
मुलं झाल्यानंतर मुलांचं ऐकून आहे

पैशाच्या लाभापोटी शिक्षण घेण्यासाठी लय आटापिटा केला तरच शहरात उच्च शिक्षण शिकू देतात. शहरातील एक टक्का स्त्रीयाना नौकरीवर जावू देतात  पण नौकरीच्या ठिकाणी मी पुरुषांचच ऐकून आहे.

खेड़यातील स्त्री-मुलगी म्हणजे गुलामीच जीत-जागतं
रूप. जेव्हढा शाळेचा वर्ग गावात, तिथंच शाळा बंद…. पण जन्मानन्तर सौन्दर्याच्या नावाखाली कान टोचा, नाक टोचा, पायात साखळ्या, हातात बांगड्या भरा निमूटपणेे मी सारं ऐकूनच आहे,


महिला समानाधिकाराचं हिंदू कोड बिल भारतीय पुरुषांना स्वातंत्र्यावेळी मान्य नव्हतं आणि आजपर्यंत महिलांना ते काय आहे कोणी आणले हे माहित नाही...
कारण माहित करून घ्यायचे कि नाही हे पण मी पुरुषांचच ऐकून आहे

आता कुठे २००५ साली मला संपत्तित समान हिस्सा मिळाला पण हिस्सा मागायचा का नाही हे मी पुरुषांचच ऐकून आहे
जागतिक दबावामुळे म्हणा निवडणुकीसाठी महिला आरक्षण आलं पण निवडून आले तरी पुरुषांचंच ऐकून आहे

नाही ऐकलं तर
नाहीच ऐकलं तर  
कधी देवदासिच्या बहाण्याने,
कधी धर्माच्या बहाण्याने,
कधी सतीच्या बहाण्याने, हो सतीची प्रथा एवढ्यासाठीच होती कि माझ्या राखेतून जन्मभर घडवलेले दागिने काढण्याचा अधिकार फक्त उच्च जातीच्या व्यक्तीस होता.

ढ़ोंगीबाबा खूप आहेत, ढ़ोंगीबाई कुठेच नाही,
ढोंग कधी कुठं करायचं हे पण मी पुरुषांच ऐकून आहे
बुआबाबाचं, ढ़ोंगीबाबाचं ही मी ऐकूनच आहे..

स्वतःची कला आर्ट, शिल्प, नृत्य, चित्र कोणतीही कला असो तिचा खून करायचा शिकले मी आता,
कला कौशल्य आहे, हे सांगायचं कि नाही, हे पण मी पुरुषांचच ऐकून आहे

एकाही घरी अश्रद्धेनं साधं चिरकुट जळत नाही
तिथं कधी हुंडा कधी संशयावरून मी निर्जीव वस्तू म्हणून ढण ढण जळत होते जळत आहे...तरीही मी ऐकूनच आहे

सज्ञान तरुण अनाथ मुलींसाठी अनाथाश्रम तुम्ही पाहिला का? वृद्ध झाल्यावर वृद्ध महिला वृद्धाश्रमात मरत आहेत
तर तरुण मुली, देवदासी, विक्री झालेल्या अज्ञान व तरुण मुली आणि खुद्द मायबापांनी त्यागलेल्या पोटच्या पोरी नवऱ्याने सोडलेल्या बायका, पळवलेल्या फसवलेल्या मूली वेश्यालयात मरत आहेत.

या एवढ्या तेवढ्या भीतीनेच मी पुरुषांचं ऐकूनच होते
मी पुरुषांचंच ऐकून आहे  
मी ऐकूनच राहणार

म्हणून महिलानो, मुलींनो, बहिणीनो, मातांनो तुमच्यातील जिजाऊ, रमाई, सावित्री, अहिल्यादेवी, राणी झलकारीबाई जागी करा
जिवंत करा जिवंत करा….

---चारुशील माने*

मंगलवार, 22 मार्च 2016

सूर्याची होळी चोवीस तास
धरतीवर होळी बारा तास
झाडतोडीचा शेतकऱ्या फास
का रे तुला झाड़होळीची हौस
--चारुशील माने

रविवार, 21 फ़रवरी 2016

Jijau Vandana

जिजाऊ वंदना

जिजा माउली गे , तुला वंदना हि|
तुझ्या प्रेरणेने , दिशा मुक्त दाही ||१||



भयातून मुक्ती , मिळाली जनांना |
गुलामी कुणाला, कुणाचीच नाही ||२||



नसे दु:ख कोन , नसे न्यून कोणा |
फुलांना मुलांना , नसे दैन्य काही ||३||
जिजा माउली गे......

जशी पार्वती ती, प्रिया शंकरास
तशी प्रेरिका गे , शहाजींस तुही ||४||



जसा संविभागी ,बळी पूर्वकाळी |
शिवाजी जणांच्या , तसे चित्त्देहि ||५||
जिजा माउली गे....



तुझ्या संस्कृतीने ,तुझ्या जागृतीने |
प्रकाशात न्हाती , मने हि प्रवाही ||६||



तुला वंदिताना , सुखी अंग अंग |
खरा धर्म आता ,शिवाचाच पाही ||७||


खरा धर्म आता ,शिवाचाच पाही…
जिजा माउली गे... जय जिजाऊ , जय जिजाऊ...

संगीतसूर्य केशवराव भोसले keshavrao bhosle gaurav geet

गौरव गीत

इथे न नाजुक मोर पिसारा
पण गरुडाचे गगन भेदने
मर्म मराठा बुलंद बाणा
ऐसा केशव पुन्हा न होणे

सारे अभिनय गायन वैभव
सर्व कला या देश हितास्तव
असे मानिले सदैव ज्याने
ऐसा केशव पुन्हा न होणे

समर्थ ज्याचे सतेज गाणे
समशेरीचे जणु लखलखणे
कंठमणि तो रंगभूमिचा
ऐसा केशव पुन्हा न होणे

शनिवार, 6 फ़रवरी 2016

Gungunau mai गुनगुनाऊँ मैं

गुनगुनाऊ मैं नाम ही मैं तेरा
सुनसुनाऊ मैं नाम ही ये तेरा
कभी ना कभी होठों पे तेरे
आयेगा नाम मेरा...|| धृ ||
                    गुनगुनाऊ मैं नाम ही मैं तेरा।

रहे जहाँ हीरा
वहाँ पर्बतों का घेरा
पाने के लिए जिसे
ज़िन्दगी है फेरा
कहीं ना कहीं जुड़ा है नाता
तुझी से सनम मेरा...|| 1 ||
                गुनगुनाऊ मैं नाम ही मैं तेरा

दर्दों की राहों में
दर्दों का है मेला
यादों का पाला है
पैरों में है छाला
कभी ना कभी राहों से तेरी
मिलेगा रस्ता मेरा...|| 2 ||
             गुनगुनाऊ मैं नाम ही मैं तेरा

तेरे बिना सोचा तो
ज़ी ही टूट गया
मोहब्बतने हमें
तालीफ़ है किया
ज़िन्दगीने कितना
हमें झाँसा है दिया
कभी ना कभी अंधेरों में भी
सवेरा आयेगा मेरा || 3 ||
            गुनगुनाऊ मैं नाम ही मैं तेरा

मंगलवार, 12 जनवरी 2016

Sonyacha सोन्याचा

सोन्याचा नांगर दिला
जिजाऊ मातेने हाती हो
जिजाऊ मातेने हाती
पुण्याच्या कसबे मातीत
शिवबांनी नांगरली धरती हो
शिवबांनी नांगरली धरती || धृ ||

वंश बुडण्याची धमकी देऊनी
कब्जासाठी रोवली पहार
शूरवीर जिजाऊ मातेने
उखडून टाकली ती पहार ||1||
              सोन्याचा नांगर दिला...

अंधश्रद्धेला न बळी पडून -2
लोकमनाची काढली भिती
हो आमच्या मनात माँ
तव तेवेल विचारज्योती ||2||
                सोन्याचा नांगर दिला...
       - चारुशील माने

   "Sonyacha by Lalita Wavhal & C128"http://www.reverbnation.com/q/6dvr9b

Charusheel Mane (Chaaraagar) | Sonyacha by Lalita Wavhal & C128

House | Hingoli

www.reverbnation.com

सोमवार, 26 अक्टूबर 2015

दीवाली

दीवाली मनाओ...

इस साल दिवाली में
दीप ना जलाये...
फटाके ना फोड़े....
ना घरपर शो लाइट जलाये...
सब पैसा बेपारी को जायेगा....

करोडो दीप जलाने से तेल की
और ऑक्सीजन की खपत होगी
ये पैसा सड़क के गरीब बच्चों
या अनाथाश्रम के बच्चों को दो.....
(चारागर)

मुले जर फुले असतील तर
कोमल हाती फटाक्यांची अग्नी का द्यावी??

पृथ्वी जर देत असेल श्वास तर
बदल्यात फटाक्यांची विषहवा का द्यावी??

आहेत जर देशात भिकारी, दरिद्री तर
लाखोटन खाद्यतेलाची-ऑक्सीजनसह आहुति का द्यावी???
--++ चारुशील

मंगलवार, 13 अक्टूबर 2015

भारतीय खेड़े

भारतीय खेड़े

खेड़े म्हणजे विषमता
शतकांच्या कुडाच्या भिंती
शेतकऱ्यांना लावलेली मंदिराची पट्टी
दारिद्रयाचं कॉम्पिटिशन

खेड़े म्हणजे रस्त्यावर
अविद्येच्या विष्ठेचं साम्राज्य
खेड़े म्हणजे गोपनीय मतदानाला
उघडं करण्याचं ठिकाण

खेड़े म्हणजे फ़िल्टर वाटर च्या काळात
विहीरीचं पाणी पिणारे भारतीय बीमार

खेड़े म्हणजे बैलाना
नामर्द करण्याचे ठिकाण

खेड़े म्हणजे अन्नधान्याच्या
निर्मितीसाठी जुंपलेले गुलाम
          - चारागर (चारुशील माने)