रविवार, 21 फ़रवरी 2016

Jijau Vandana

जिजाऊ वंदना

जिजा माउली गे , तुला वंदना हि|
तुझ्या प्रेरणेने , दिशा मुक्त दाही ||१||



भयातून मुक्ती , मिळाली जनांना |
गुलामी कुणाला, कुणाचीच नाही ||२||



नसे दु:ख कोन , नसे न्यून कोणा |
फुलांना मुलांना , नसे दैन्य काही ||३||
जिजा माउली गे......

जशी पार्वती ती, प्रिया शंकरास
तशी प्रेरिका गे , शहाजींस तुही ||४||



जसा संविभागी ,बळी पूर्वकाळी |
शिवाजी जणांच्या , तसे चित्त्देहि ||५||
जिजा माउली गे....



तुझ्या संस्कृतीने ,तुझ्या जागृतीने |
प्रकाशात न्हाती , मने हि प्रवाही ||६||



तुला वंदिताना , सुखी अंग अंग |
खरा धर्म आता ,शिवाचाच पाही ||७||


खरा धर्म आता ,शिवाचाच पाही…
जिजा माउली गे... जय जिजाऊ , जय जिजाऊ...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें