फेरफार नोंदीतील चुकांची दुरुस्ती
सातबारा फेरफार मध्ये झालेल्या चुकांमुळे सातबारा वर तशीच नोंद केली जाते.
फेरफारमधील चुकांची दुरुस्ती कशी करावी :-
१.लेखनातील चुका व त्याची दुरुस्ती :-
हमखासपणे नावात चुका होतात. एखादा गट नंबर वगळला जातो. अशा प्रकरणी महसूल खात्याने नव्याने नोंद घेण्याची आवश्यकता नसते. लेखन प्रमादानातील चूक दुरुस्त करतेवेळी खातेदाराने थेट संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करावा.
तहसिलदार यांना कलम 155 महाराष्ट्र महसूल अधिनियमाखाली संबंधित रेकॉर्ड दुरुस्त करून घेण्याचे अधिकार असतात. ज्या प्रकरणात महसूल खात्याची चूक असते; अशा केसेसमध्ये तहसीलदार निर्णय घेऊन चूक दुरुस्ती करून घेऊ शकतात. मात्र योग्य ती कार्यवाही करावी; असा आदेश महसूल कर्मचाऱ्यांना देऊ नये तर जमीन महसूल कायद्यातील संबंधित तरतुदीखाली चूक दुरुस्त व्हावी असे आदेश द्यावेत.
२. हक्काबाबत होणाऱ्या चुका व त्याची दुरुस्ती:-
जमिनीच्या मालकी हक्क ,कुल ,वारसा, उत्तराधिकारी इत्यादी हक्कांमध्ये आपल्याला स्थान देण्यात आले नाही असे वाटणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या पुराव्याच्या आधारे आपणास सादर बाबत हक्क आहे. हे मांडण्यासाठी फेरफार नोंदी विरुद्ध रीतसर अपील किंवा फेर तपासणी केली पाहिजे.
जमीन व्यवहाराच्या बाबतीत फेरफारमध्ये झालेल्या चुका व त्याची दुरुस्ती बाबत :-
पूर्वी झालेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती संबंधी नोंदणी दुबार होणे कामी अपील करावी लागते. असा अर्ज केल्यानंतर फार तपासणी केली जाते व नंतरच दुरुस्ती संबंधी निर्णय घेण्यात येतो. शेतकरी तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करतात व फेरफार नोंदीमध्ये दुरुस्तीचा आग्रह धरतात परंतु त्यासाठी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते जरी चूक असेल तरी सुद्धा योग्य प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
Adv. सी. एम. माने,
मो. 9850579953 कायदेशीर सल्ला
#७/१२ #7/12 #सातबारा #दुरुस्ती #7/12 दुरुस्ती #फेरफार #शेती #शेतकरी #हक्क #तलाठी #फेर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें