सोमवार, 26 जून 2023

अमेरिकेत 120 देश सहभाग घेणाऱ्या 13,868 चित्रपटांच्या स्पर्धेत भारतातील हिंगोलीच्या "फॉर सेल" चित्रपटास (क्वार्टर-फायनालिस्ट अवॉर्ड) उपांत्य पुरस्कार

अमेरिकेत 120 देश सहभाग घेणाऱ्या 13,868 चित्रपटांच्या स्पर्धेत भारतातील हिंगोलीच्या "फॉर सेल" चित्रपटास (क्वार्टर-फायनालिस्ट अवॉर्ड) उपांत्य पुरस्कार


न्यूयॉर्क - अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात आयोजित विद्यार्थ्यांतर्फे घेण्यात येणारा जगातील सर्वात मोठा स्टुडन्ट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टिवल 2023 ज्यामध्ये 120 देश सहभाग घेणाऱ्या 

13,868 चित्रपटांच्या स्पर्धेत

अठरा वर्ष वयापेक्षा कमी व अठरा पेक्षा जास्त वयोगटातील चित्रपट निर्मात्यांना एकूण नऊ कॅटेगरी मध्ये प्रत्येकी तीन पुरस्कार 25 जून 2023  रोजी न्यूयॉर्क येथे पुरस्कार घोषित करण्यात आले. ज्यामध्ये सुपर शॉर्ट फिल्म, शॉर्ट फिल्म, ड्रामा, डॉक्युमेंटरी, ॲनिमेशन, कॉमेडी, फिचर फिल्म, म्युझिक अँड व्हिडिओ, फिल्म अबाउट ए सोशल इश्यू या नऊ कॅटेगिरी मध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्याना प्रत्येकी तीन व अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेले निर्माते यांना प्रत्येकी तीन प्रथम द्वितीय तृतीय असे एकूण 54  पुरस्कार देण्यात आले 

तसेच ग्लोबल इम्पॅक्ट ग्रँड ज्युरी अवार्ड, तसेच ग्लोबल इम्पॅक्ट इमर्जिंग फिल्म विजनरी अवार्ड, तसेच ग्लोबल इम्पॅक्ट इन्स्पिरेशन अवॉर्ड तसेच ग्लोबल इम्पॅक्ट एक्सलन्स इन फिल्म अवॉर्ड, ग्लोबल इम्पॅक्ट ग्रँड प्राईज अशा पाच कॅटेगरीमध्ये अठरा वर्ष वयाखालील निर्माते व 18 पेक्षा वयाने मोठे असलेले निर्माते यांना प्रत्येकी एक असे एकूण दहा पुरस्कार देण्यात आले. व इतर पाच पुरस्कार असे एकूण 59 व चित्रपट महोत्सवातील अंतिम फेरीत शीर्ष तीन नामांकित अंतिम स्पर्धक पुरस्कार (फायनालिस्ट अवॉर्ड) असे 62 पुरस्कार महोत्सव दिग्दर्शक मार्क लशीन्सकी यांनी न्यूयॉर्क येथे लाईव्ह कार्यक्रमात जाहीर केले.


या  महोत्सवातील 13868 चित्रपटांमधून अंतिम फेरीत शीर्ष तीन नामांकित अंतिम स्पर्धक पुरस्कार (फायनालिस्ट अवॉर्ड) सर्वोत्कृष्ट तीन चित्रपटांना म्हणजेच फायनालिस्ट अवॉर्ड , सेमी-फायनालिस्ट अवॉर्ड व क्वार्टर-फायनालिस्ट अवॉर्ड असे पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी

भारतातील "फॉर सेल" लघुपटास सामाजिक प्रश्ना बाबत सर्वोत्कृष्ट चित्रपट (बेस्ट फिल्म अबाऊट सोशल इश्यू) म्हणून क्वार्टर-फायनालिस्ट अवॉर्ड जाहीर झाला आहे. त्यापूर्वी सदर महोत्सवात "फायनालिस्ट अवॉर्ड" मिळवण्यापूर्वी "ऑनरेबल मेंशन" आणि "नॉमिनी" हे दोन पुरस्कार मिळवणे क्रमप्राप्त असते. याबाबत सर्व माहिती www.lightfilmfest.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. काही दिवसापूर्वीच "फॉर सेल" हा लघु चित्रपट स्टुडन्ट वर्ल्ड इम्पॅक्ट फेस्टिवल 2023 मध्ये निवड झाला होता.


महोत्सवाद्वारे मेलद्वारे कळविले की SWIFF सर्व सबमिशन फी माफ करून तुमच्यासारख्या चित्रपट निर्मात्यांना सक्षम बनवण्यासाठी समर्पित आहे आणि SWIFF समुदायाचा एक भाग म्हणून, तुम्हाला भविष्यात अधिक रोमांचक संधींमध्ये प्रवेश मिळेल.  SWIFF हे Amazon Prime Video Direct चे वितरण भागीदार आहे आणि क्वार्टर-फायनल अवॉर्ड विजेते म्हणून, तुम्हाला SWIFF द्वारे अमेझॉन प्राइम व्हिडिओ वितरणामध्ये विशेष प्रवेश मिळेल. स्टुडंट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टिव्हल (SWIFF) हे जगभरातील विद्यार्थी चित्रपट निर्मात्यांच्या कलात्मक प्रतिभेचे प्रदर्शन करण्याचे प्रमुख व्यासपीठ आहे.  दरवर्षी 120 देशांतील चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन.  SWIFF चित्रपट निर्मात्यांना त्यांचे करिअर उंचावण्याची आणि मनोरंजनाच्या जगामध्ये एक्सपोजर मिळविण्याची संधी देते.

 

तसेच स्क्रिनिंग प्रमाणपत्रात नमूद केले की,

 "फॉर सेल"चे आमच्या न्यायाधीशांनी खूप कौतुक केले आणि त्यांचे स्वागत केले.  ज्युरी सदस्यांमध्ये वैचारिक चर्चा घडवून आणण्याची खळबळ निर्माण करण्यात  "फॉर सेल" यशस्वी झाला, जो "फॉर सेल" च्या गहन प्रभावाचा पुरावा आहे.


 आम्ही निर्मात्यांना आणि "फॉर सेल" साठी तयार करण्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा देतो.  चित्रपटाशी संबंधित व्यक्ती: चारुशील माने, ज्योती इंगोले, वैष्णवी निनल.  सपना जैस्वाल, हर्षवर्धन माने.  स्वर्गीय चंद्रज्योती मदन रायबोले यांची नावे नोंद करून स्क्रिनिंग प्रमाणपत्र देखील महोत्सवाचे वतीने देण्यात आले आहे.

भारतातील फॉर सेल या लघुपटास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेल्या पुरस्काराबद्दल देशातून व परदेशातून ॲड. चारुशील माने यांचे व सर्व कलाकारांचे कौतुक होत आहे. यात चारुशील माने यांनी स्वलिखित रॅप गाणे, स्वतः भूमिका केली असून,  लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, गायक, व्हिडिओ एडिटर, संगीतकार अशा भूमिका बजावल्या आहेत. चारुशील माने हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळात चित्रपट दिग्दर्शक म्हणून सदस्य असून, देशातील म्युझिक कंपोझर असोसिएशन ऑफ इंडिया या संगीतकार संस्थेचे व इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी या आंतरराष्ट्रीय सिस्टर संस्थेचे सदस्य आहेत. या पूर्वी "फॉर सेल" इंग्लंडमध्ये दोन महोत्सवात निवड होऊन प्रदर्शित झाला होता. "फॉर सेल" व्यतिरिक्त "दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स" लघुपट देखील इंग्लंडमध्ये निवड होऊन प्रदर्शित झाला होता. ग्रामीण मानसिक गुलामगिरी वर भाष्य करणारा "मळण" देखील 15 पुरस्कार प्राप्त आहे. क्लायमेट चेंज बाबत - "ह्यूमन- अ डेव्हिल" व आरोग्याबाबत  "ब्रेथ ऑफ डेथ" ही डॉक्युमेंटरी फिल्म, तसेच कायद्याबाबत जागृती साठी "डोळा मार" ही कॉमेडी सिरीज चा पहिला भाग रिलीज झाला असून, बालविवाह प्रथा बाबत "उध्वस्त बाहुल्या" रॅप व तरुणींच्या ऍसिड हल्या बाबत "ऍसिड अटॅक" रॅप इत्यादी विविध विषयांवर तसेच न्यायालयीन कायदेविषयक शिबिरात व नगर परिषद साठी "पथनाट्य" देखील सादर केलेले असून काही पेंटिंग्स काढल्या असून सदर पेंटिंग्स चे प्रदर्शन बाबत देखील त्यांनी मानस व्यक्त केला.

  "येणारा येतोय जाणारा जातोय" तसेच "भिजत्या या पावसात रूप तुझं हसतंय" इत्यादी चारुशील यांनी लिहिलेली, संगीतबद्ध केलेली टपोरी गाणी देखील रिलीज झाली आहेत. सध्या 5000 हुन अधिक गाणी रेकॉर्डिंग साठी तयार असल्याचे सांगितले.


ऑस्कर-पात्र न्यू ऑर्लीन्स फिल्म फेस्टिव्हल हा अमेरिकन दक्षिणपूर्व मधील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे, त्या महोत्सवात काही दिवसांपूर्वी "फॉर सेल" दाखल झाला आहे, जो पुढे सदर महोत्सवाद्वारे निवड झाल्यास ऑस्कर स्पर्धेत जाऊ शकतो, असे देखील ॲड. चारुशील माने यांनी कळविले आहे. यापुढील योजनेबाबत विचारले असता मोठ्या चित्रपटासाठी एक दोन निर्मात्यांनी त्यांना ऑफर देखील दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें