गुरुवार, 30 अगस्त 2018

लिहिले होते कपाळी

गझल (संगीतबद्ध) सादर आहे-

लिहिले होते कपाळी ती नियति लूटून गेली राख वचनांची क्षणात ओळख बदलून गेली
.......
।।।।।
2018 #*नाशिक इंटरनेशनल फ़िल्म फेस्टिवल* मध्ये निवड होऊन बेस्ट मराठी ग़ज़ल्स म्हणून नामांकन प्राप्त ग़ज़ल अल्बम मधील एक ग़ज़ल...आपल्यासाठी सादर केली आहे...
https://youtu.be/aSqA8vwC66w

बुधवार, 29 अगस्त 2018

Khani Milalya खाणी मिळाल्या Marathi ghazal


https://open.spotify.com/track/3vH48xtMSC1FM0zRlfhds5?si=plvcriQWSIyUfpbrqUUWWQ

2018 #*नाशिक इंटरनेशनल फ़िल्म फेस्टिवल* मध्ये निवड होऊन बेस्ट मराठी ग़ज़ल्स म्हणून नामांकन प्राप्त ग़ज़ल अल्बम मधील एक ग़ज़ल...आपल्यासाठी सादर केली आहे...यूट्यूब वर कॉमेंट करा...
आवडल्यास शेअर करा,
#*Namaskar* 😊🙏
*The Song Is Out!!!!*
So, here is the #full song of my version of the song #*KHANI #MILALYA*
Sir the Marathi song is in a *#ghazal genre* .
It's a small video too. Please give your precious time to it.. I'll be honoured .. *Please* 🙏
please give your valuable *#comment*..Ill truly be encouraged by it.Please 🙏🙏🙏🙏🙏
Please.........................



https://open.spotify.com/track/3vH48xtMSC1FM0zRlfhds5?si=plvcriQWSIyUfpbrqUUWWQ

2018 नाशिक इंटरनेशनल फ़िल्म फेस्टिवल मध्ये निवड होऊन बेस्ट मराठी ग़ज़ल्स म्हणून नामांकन प्राप्त ग़ज़ल अल्बम मधील एक ग़ज़ल...आपल्यासाठी सादर केली आहे...

यूट्यूब वर कॉमेंट करा... Youtube Premium Members
https://m.youtube.com/watch?v=zLsHpl-uyQA
आवडल्यास शेअर करा,

Namaskar everyone😊🙏

*The Song Is Out!!!!*
So, here is the full song of my version of the song *KHANI MILALYA*
Sir the Marathi song is in a *ghazal genre* .
It's a small video too. Please give your precious time to it.. I'll be honoured .. 

*Please* 🙏
Sir please give your valuable *comment*..Ill truly be encouraged by it. Please 🙏🙏🙏🙏🙏
https://m.youtube.com/watch?v=zLsHpl-uyQA
.........................

मंगलवार, 28 अगस्त 2018

Khani milalya - a new Nominated gazal album song मराठी नवीन गझल 2018

मराठी नवीन गझल 2018

नाशिक इंटरनेशनल फ़िल्म फेस्टिवल मध्ये निवड होऊन बेस्ट मराठी ग़ज़ल्स म्हणून नामांकन प्राप्त ग़ज़ल अल्बम मधील एक ग़ज़ल...आपल्यासाठी सादर केली आहे...यूट्यूब वर कॉमेंट करा...

आवडल्यास शेअर करा, भावानो
https://youtu.be/7tDyB3wwfO4

रविवार, 22 जुलाई 2018

झोपली स तर

#झोपली #तर

फक्त रात्र एव्हढच जीवन आहे, असं समज
म्हणून न झोपता जागीच रहा
झोपली तर उठू नको, इथं जागी असणाऱ्यांची
शिकार होते, बघ देश कसा गाढ झोपेत आहे

गुलामीचे साखळदंड तोडून मुक्त झेप घेण्याची
खेप तुझ्यावर येऊ देऊ नको
आकाशात शिकाऱ्यांंचे बाण तयार आहेत,
म्हणून जे आहे त्यातच समाधान मान स्वप्न बघू नको

जन्माच्या आधीच तुझी जात ठरलेली,
लग्नाची गाठ स्वर्गात बांधलेली,
ती गाठ ही जातीच्या बाहेर कधीच नाही,
स्वर्गातही जातीभेदाची मूळे भिनलेली

तू गर्भात असतानाच तुला मारण्यासाठी
मशीन आणि कैच्या आहेत तयार इथं
जन्म झाल्यावर मोठी होण्याआधीच तुला
बरबाद करण्याची तयारी इथला हिंदुस्थानी करत असतो,
लक्षात ठेव आपले आणि परके सारखेच इथं

गेली शाळेत तर मास्तर पासून दूर राहा,
दुकानावर गेलीस तर मान खाली घालून बोल,
बघू नको त्याच्याकडं…
एकटी रिक्षात ही बसू नकोस,
शौचास दूर जाणं ही धोक्याचंच
मोगल-साम्राज्यातही हीच भीती होती
लांब शिकायला जाऊ नको,
कुणाला रस्त्यात लिफ्टही मागू नको,
सुनसान आडवळणी रस्ते,
एकाकी गल्ली मधून जाऊ नको
गर्दीचा हमरस्ता वापर
कोणतीही स्त्री किंवा मुलगी असो
तिच्याकडून काहीच खाऊ नको
मम्मी-पप्पानं बोलवलं असं सांगितलं
तर पासवर्ड विचार
चॉकलेट ही खाल्लंस तर तुला नेपाळमध्ये जाग येईल तुझं नवीन ओळखपत्र बनेल,
निर्यात बाजारपेठेत हजारोच्या ढिगातील एक वस्तू होशील
मैत्रिणीवर पण विश्वास ठेवू नको,

धार्मिक स्थळांपासून ही दूरच रहा
परराज्यातील अज्ञात व्यक्तीशी लग्न करू नको
नातलग, सहल, रेल्वे, रोडवरील वाहने, कार्यालयं,
सर्वत्र हिंदुस्थानात जपून रहा

आधारगृहातून 18 ची झालीस की तुझ्या लैंगिक शोषणासाठी हिंदुस्थानी रस्त्यावर टक लावून उभाच आहे इथं
बालगृहाचा कायदा ही म्हणतो जा मर खप तिकडं लय ट्रेनिंग दिलं तुला, पुरुषांना झेलण्याचं…

तुझे हात धुणी-भांडी घासताना, अन स्वयंपाकात चांगले दिसतील, इथली संस्कृती जपणाऱ्या भातुकल्याना
तुझा चेहरा सौद्यासाठी पाहिला जातो
म्हणून रस्त्याने कुणाला बोलू नको, हिंदुस्थान आहे,

प्रेमविवाह केला तर माहेराला जाणं कायमचं विसरून जा
आई-वडीलाना प्रेमप्रकरण माहीत झालं तर ते तुला ऑनर किल्लिंगच्या नावाखाली मारून टाकतील..


हॉस्टेलात व पार्ट्यातून ते तुला थम्स अप मधून बिअरची सवय लावतील…
विराण शेतं आणि माळरानं तुला ओक्साबोक्षी रडताना नेहमीच पाहतात,
रात्रीच्या वेळी ऐकू येणारी तुझी आकांताची कोल्हेकुई भीतीने शेकडो वर्षांपासून म्यूट झाली आहे,

भोंदूबाबा महाराज औषधाने नाही तर गुंगी देऊन बलात्कारातून मूल देतो लक्षात ठेव

तू तक्रार कुठे देशील? पोलिस तक्रार ही घेणार नाहीत.तक्रार देशील तर तेथून अनेकदा ठाण्यापासून कोर्टापर्यंत मानसिक बलात्कार होईल...तुझ्यावर

उघडू नको फेसबुक व्हाट्सअप्प कारण हिंदुस्थानी लोक तुला घाणेरडी चित्रं पाठवतील, व्हाईट कॉलर मधल्या स्त्रीलंपट लोकांचे कॉल, एसेमेस, विडिओ तुला वाम मार्गाला लावतील..

म्हणून विचार करतो कि मग शिकण्याआधी
तुझा बालविवाह करून टाकला तर मानसिक रुग्ण बनून जीवनरात्र जग मेल्यासारखी…

  • चारुशील माने

सल - मुलीची कथा

सल
खेड्यात एक गरीब कुटुंबात एक मुलगी असलेला शेतकरी रघु  दुसऱ्या अपत्याची वाट पाहतो.
मुलगा होवो, कुटुंबातील व नातलगांची एकच ईच्छा !!
धडपड करून गर्भनिदान करतो, व नंतर सतत नाराज असतो, गर्भपाताचा निर्णय घेतो.
पण त्यास एक व्यक्ती (मुलांनीआधारगृहात हाकलून दिलेला )भेटतो तो स्वतः चे हाल ---
दोषच नव्हता कुणाचा...दोषी तरी मि झालो
सुखाच्या मार्गी जाता दुखाच्या दारी आलो
(गीतातून(2मिनिट) सांगतो,)
तितक्यात
शासनाची मुलीच्या नावाने पैसे फिक्स्ड डिपॉझिट होत असल्याची जाहिरात गाडी फिरते. व महिला विषयक अनेक योजना त्यास माहीत होतात..
गावात सत्काराचा समारंभाचा आवाज ऐकतो, तेथे गावातली कमली पी एस आय च्या ड्रेस मध्ये असते, व गावात सत्कार होतो,
रघु वापस घरी येऊन बायकोच्या गळ्यात पडतो, म्हणतो अगं ती मळकी कमली पी एस आय झाली, आपल्याला दोन्ही बी पोरी झाल्या ना तरी त्येंनला लयी शिकवायचं, बघ..
बायको खुशीने रडायला लागते.....अख्खं आयुष्य खूनी झाल्याची सल मनात राहत होती.
आपल्याला नाही करायचा गर्भपात....असं म्हणून रघु पत्नीच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवतो...
     कथा -चारुशील माने
https://youtu.be/UFNeA8QlE4Q

मी ऐकूनच आहे

*मी ऐकूनच आहे

मागच्या शतकात, त्या मागच्या आणि त्या मागच्या शतकात हजारो वर्षापासुन मी ऐकूनच आहे
बालपणापासून इंग्रजीतले डैड असो कि मराठीतले बाबा,
मामा, काका, आजोबा, भावाचं ऐकूनच आहे.


कोणती शाळा कोणता अभ्यास कोणता पोशाख
कोणत्या मैत्रिणी कोणती परीक्षा कोणती नौकरी
कोण नवरा कोणतं सासर. कधी लग्न कधी गर्भपात कोणता देव कोणती पूजा साऱ्यात मी ऐकूनच आहे

लग्नाचा होकार ही पुरुष लोकच ठरवतात.
लग्नानंतर सासरा, दीराचं ऐकून आहे
मुलं झाल्यानंतर मुलांचं ऐकून आहे

पैशाच्या लाभापोटी शिक्षण घेण्यासाठी लय आटापिटा केला तरच शहरात उच्च शिक्षण शिकू देतात. शहरातील एक टक्का स्त्रीयाना नौकरीवर जावू देतात  पण नौकरीच्या ठिकाणी मी पुरुषांचच ऐकून आहे.

खेड़यातील स्त्री-मुलगी म्हणजे गुलामीच जीत-जागतं
रूप. जेव्हढा शाळेचा वर्ग गावात, तिथंच शाळा बंद…. पण जन्मानन्तर सौन्दर्याच्या नावाखाली कान टोचा, नाक टोचा, पायात साखळ्या, हातात बांगड्या भरा निमूटपणेे मी सारं ऐकूनच आहे,

ढ़ोंगीबाबा खूप आहेत, ढ़ोंगीबाई कुठेच नाही,
ढोंग कधी कुठं करायचं हे पण मी पुरुषांच ऐकून आहे
बुआबाबाचं, ढ़ोंगीबाबाचं ही मी ऐकूनच आहे..

स्वतःची कला आर्ट, शिल्प, नृत्य, चित्रकला कोणतीही कला असो कलेचा खून करायचा शिकले मी आता..
कारण कलाकौशल्य आहे, हे सांगायचं कि नाही, हे पण मी पुरुषांचच ऐकून आहे

महिला समानाधिकाराचं हिंदू कोड बिल भारतीय पुरुषांना स्वातंत्र्यावेळी मान्य नव्हतं आणि आजपर्यंत महिलांना ते काय आहे कोणी आणले हे माहित नाही...
कारण माहित करून घ्यायचे कि नाही हे पण मी पुरुषांचच ऐकून आहे

आता कुठे २००५ साली मला संपत्तित समान हिस्सा मिळाला पण हिस्सा मागायचा का नाही हे मी पुरुषांचच ऐकून आहे
जागतिक दबावामुळे म्हणा निवडणुकीसाठी महिला आरक्षण आलं पण निवडून आले तरी पुरुषांचंच ऐकून आहे

नाही ऐकलं तर
नाहीच ऐकलं तर  
कधी सतीच्या बहाण्याने, हो सतीची प्रथा एवढ्यासाठीच होती कि माझ्या राखेतून जन्मभर घडवलेले दागिने काढण्याचा अधिकार फक्त उच्च जातीच्या व्यक्तीस होता.
कधी देवदासिच्या बहाण्याने,
कधी धर्माच्या बहाण्याने,
जिथं एकाही घरी अश्रद्धेनं साधं चिरकुट जळत नाही
तिथं कधी हुंडा कधी संशयावरून मी निर्जीव वस्तू म्हणून ढण ढण जळत होते जळत आहे...तरीही मी ऐकूनच आहे

सज्ञान तरुण अनाथ मुलींसाठी अनाथाश्रम तुम्ही पाहिला का? वृद्ध झाल्यावर वृद्ध महिला वृद्धाश्रमात मरत आहेत
तर तरुण मुली, देवदासी, विक्री झालेल्या अज्ञान व तरुण मुली आणि खुद्द मायबापांनी त्यागलेल्या पोटच्या पोरी नवऱ्याने सोडलेल्या बायका, पळवलेल्या फसवलेल्या मूली वेश्यालयात मरत आहेत.
या एवढ्या तेवढ्या भीतीनेच मी पुरुषांचं ऐकूनच होते
मी पुरुषांचंच ऐकून आहे  
मी ऐकूनच राहणार कारण मी संस्कृती, संस्कार, चूल आणि मूलाच्या जाळ्यातील भारतीय स्त्री आहे…..

---चारुशील माने*
https://youtu.be/UFNeA8QlE4Q

मंगलवार, 17 जुलाई 2018

Marathi short film मराठी लघु चित्रपट

https://youtu.be/UFNeA8QlE4Q
एक आई म्हणून...
एक बाप म्हणून...
एक भाऊ म्हणून...
 एक बहीण म्हणून...
एक मुलगी
वेश्या बनण्याआधी वाचवा...
शॉर्ट फिल्म शेअर करा🙏

नमस्कार मित्रांनो,
🙏यापूर्वी *#10व्या_नाशिक_इंटरनॅशनल_फिल्म_फेस्टिवल_मध्ये _बेस्ट_शॉर्ट_फिल्म__म्हणून_नामांकन_प्राप्त* _🔥 *#दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रांसपोर्टर्स*  हा लघुपट
*#पुणे_आंतरराष्ट्रीय_लघुपट_महोत्सव_2018* मध्ये ऑफिशियल स्क्रीनिंग साठी सिलेक्शन होऊन
🌷🌷
#=दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रांसपोर्टर्स" ला बेस्ट_राइटर_अवार्ड चे नॉमिनेशन जाहिर 🔥🔥1111 फ़िल्म मध्ये उत्कृष्ट लेखक चे नामांकन 🌻🌻
सर्व टीम चे अभिनंदन !! 🌹🌸Thanks a lot Amol Bhagat sir & team of isffpune 3rd International Short Film Festival, Pune !!!🌺🌺
🙏thanks 1111 films फिल्मस मध्ये बेस्ट राईटर साठी 15 नामांकन आहेत, त्यात ही फ़िल्म आहे,
अवार्ड/पुरस्कार साठी निवड होण्याची आशा आहे

*#दिग्दर्शक_चारुशील _माने_व_त्यांची_टीम* यांना
*#क्ल्युआर्ट_म्युझिक_अँड मूव्हीज_प्रा._लि.* कडून *#दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रांसपोर्टर्स* चे सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐👍🙏🙏🙏

चित्रपटात नवीन मराठी गझल्स साठी संपर्क करावा

🎼🎤🎬चित्रपटात नवीन मराठी गझल्स  साठी संपर्क करावा...

खालील गझल्स तयार आहेत - "सौंदर्याच्या खाणी" album
🌸NIIF 2018 selected and Nominated as Best Marathi Gazals🌸
1. भूलण्या तुला नयन मिटता स्वप्नात तूच असते
2. ते यौवनाचे सारे बितून गेले, आणाभाकातले हात कबर खतून गेले
3.काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
मी जरी रडलो असा मैफिल बनून सुरात सजली
4. मर्महीन वाटा प्रीतधुंदीत तुडवीत गेलो अबोल त्या हाका वेळोअवेळी ऐकीत गेलो
5.खाणी मिळाल्या कितीक सौंदर्याच्या तरी मी झुरतोच आहे
हो बुडवित होत्या मृत्यूलाटा तरी मी जगतोच आहे
6.रुसलेल्या पापण्यांचे स्मित खुलवावे कसे
परतूनी ना येई वेळ नाते जुळवावे कसे
7. काळाने भंगलेले जुळवूनी फूल बघतो
तूटलेले नसीब धागे ऊसवूनी
भूल बघतो
8. लिहले होते कपाळी ती नियती लुटून गेली
राख वचनांची क्षणात ओळख बदलून गेली
📞9422663066
🎹🎷🎺🎸🙏