शनिवार, 25 मई 2024

Maharashtra SSC 10th Result 2024 या दिवशी लागणार आहे 10 वी चा निकाल

 Maharashtra SSC 10th Result 2024 या दिवशी लागणार आहे 10 वी चा निकाल


Maharashtra SSC 10th Result 2024


Maharashtra SSC 10th Result 2024 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळां मार्फत Maharashtra SSC 10th 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत.


विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!


परीक्षेचा निकाल 10th SSC Result 2024 सोमवार दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभाग यांनी दिली आहे.


10th SSC Result असा पहा


www.mahresult.nic.in.


• http://sscresult.mkcl.org,


• https://ssc.mahresults.org.in.

शुक्रवार, 24 मई 2024

नवीन भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 85 आणि 86 मध्ये 498 जशास तसे

 ←

नवीन भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 85 आणि 86 मध्ये 498 जशास तसे

SC ने 'व्यावहारिक वास्तविकता' च्या अनुषंगाने नवीन दंड संहितेमध्ये 498 तरतुदीत बदल करण्याची सूचना केली 


ताज्या बातम्या 

  सर्वोच्च न्यायालयाने भारतीय न्याय संहिता (बीएनएस) वर प्रश्न उपस्थित केले आणि निरीक्षण केले की त्याचे पुनरुत्पादन झाले आहे. भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 498A शब्दशः. ठेवले आहे.


सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि संसदेला व्यावहारिक वास्तव लक्षात घेऊन नवीन फौजदारी संहितेत आवश्यक बदल करण्याचे आवाहन केले.


न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने पत्नीने पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द करताना हे निरीक्षण नोंदवले.


"आम्ही विधानमंडळाला विनंती करतो की, व्यावहारिक वास्तव विचारात घेऊन या समस्येकडे लक्ष द्यावे आणि दोन्ही नवीन तरतुदी लागू होण्यापूर्वी, भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 85 आणि 86 मध्ये अनुक्रमे आवश्यक बदल करण्याचा विचार करावा," असे न्यायालयाने म्हटले आहे. 


पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपीलाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आले, ज्याने पतीविरुद्धची कार्यवाही रद्द करण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की पत्नीने दाखल केलेला खटला खूपच अस्पष्ट, व्यापक आणि गुन्हेगारी वर्तनाचे विशिष्ट उदाहरण नसलेला आहे.


"एफआयआर आणि आरोपपत्राच्या कागदपत्रांचे साधे वाचन असे दर्शविते की प्रथम माहिती अहवालाद्वारे लावण्यात आलेले आरोप खूपच अस्पष्ट, सामान्य आणि व्यापक आहेत, ज्यात गुन्हेगारी वर्तनाची कोणतीही उदाहरणे नमूद केलेली नाहीत. हे लक्षात घेणे देखील उचित आहे की कोणतीही विशिष्ट तारीख किंवा वेळ नाही. एफआयआरमध्ये कथित गुन्ह्याचा खुलासा करण्यात आला आहे.


विवाहाचा संपूर्ण नाश 


सुप्रीम कोर्टाने असे निरीक्षण नोंदवले की अशा कायदेशीर पद्धती क्षुल्लक मुद्द्यांवर विवाह पूर्णपणे नष्ट करतात आणि पती-पत्नीमधील समेटाची अगदी योग्य शक्यता कमी करतात.


"अनेक वेळा, पालक,


पत्नीचे नातेवाईक, 


परिस्थिती सावरण्याऐवजी आणि विवाह वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याऐवजी, त्यांची ही कृती, एकतर अज्ञानामुळे किंवा पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलच्या निव्वळ द्वेषामुळे, क्षुल्लक मुद्द्यांवरून वैवाहिक जीवनाचा नाश होतो. पत्नी, तिचे आई-वडील आणि नातेवाईक यांच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे पोलिसच सर्व वाईटावर रामबाण उपाय आहेत. जितक्या लवकर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचेल, मग पती-पत्नीमध्ये समेट होण्याची वाजवी शक्यता असली तरीही ते नष्ट होतील," कोर्टाने नमूद केले.

भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं?

 भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं? 

 प्रस्तुत लेखात आपण शेतकऱ्यांना त्यांच्या वर्ग-2 च्या जमिनीचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करायचं आहे.  सामान्य नागरिकांना भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचं वर्ग-1 मध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया काय आहे, गेल्या काही वर्षांमध्ये या प्रक्रियेत नेमके काय बदल झाले आहेत, ते प्रस्तुत लेखात आपण भाषेत समजून घेऊ.


मग प्रस्तुत लेखात आपण याविषयीचे सरकारचे कायदे-नियम बघू.


 1)

आपण वर्ग-2 च्या जमिनींचं वर्ग-1 मध्ये रुपांतर कसं करायचं? यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा? नजराणा किती लागतो? याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ.


वर्ग-2 आणि वर्ग-1 ची जमीन म्हणजे काय?

सातबारा उताऱ्यावर तुमची जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, ते नमूद केलेलं असतं.


भोगवटादार वर्ग-1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.


भोगवटादार वर्ग-2 या पद्धतीतमध्ये खातेदारांना शासनाकडून मिळालेल्या जमिनी असतात. या जमिनींचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही.


यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश असतो.


अर्ज कसा करायचा?

8 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्यानं प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करणे) नियम, 2019 राजपत्राद्वारे प्रसिद्ध केला.


या नियमानुसार, ज्या जमिनी शासनानं नागरिकांना कृषिक, रहिवासी, वाणिज्यिक किंवा औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्कानं अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत, त्या जमिनींचं वर्ग 1 मध्ये रुपांतर करता येतं.


यासाठी तहसील कार्यालयात तहसिलदारांकडे अर्ज करता येतो.



भाग


अर्जाच्या सुरुवातीला, प्रती लिहून


त्याखाली तहसीलदार असं लिहायचं आहे.


मग त्याखाली तालुक्याचं आणि त्याखाली जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे.


मग विषय – लिहायचा आहे की,


महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम, 2019 अन्वये अर्ज.


मा. महोदय,


मी, अर्जदार नामे ---------(अर्जदाराचं नाव)


राहणार --------(गावाचं नाव)


महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग - 1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम, 2019 अन्वये खालीलप्रमाणे अर्ज सादर करीत आहे.


जमीन धारकाचे नाव:-

जमीन धारकाचा संपूर्ण पत्ता:-

जमीन धारकाचा संपर्क क्रमांक:-

जमीन धारकाला जमीन प्रदान करण्यात आलेल्या आदेशाचा क्रमांक व दिनांक:-

जमीन धारकाला प्रदान करण्यात आलेली जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यात आली आहे की भाडेपट्टयाने?-

जमिनीचा तपशील असं लिहून तो पुढीलप्रमाणे लिहायचा आहे.


सुरुवातीला गावाचे, तालुक्याचे मग जिल्ह्याचे नाव लिहायचं आहे.


मग अनुक्रमांक, त्यानंतर कोणत्या गटात ती जमीन आहे तो गट किंवा भूपामन क्रमांक आणि शेवटी जमिनीचं क्षेत्र एकर आर मध्ये लिहायचं आहे.


अशाप्रकारे वेगवेगळ्या गटात जमीन असेल तर ते एकाखाली एक नंबर टाकून लिहायचं आहे.


उपरोक्त जमीन, महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करणे) नियम, 2019 अन्वये भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेकामी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करीत आहे.


सदर जमिनीचे नियमानुसार होणारे अधिमूल्य शासनास अदा करण्यास मी तयार आहे. कृपया माझी उपरोक्त जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करून मिळावी.


वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी व बरोबर आहे.


पुढे अर्जदाराची सही करून ठिकाण आणि दिनांक म्हणजेच तारीख टाकायची आहे.


नजराणा किती लागतो?

बदललेल्या नियमांनुसार, खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग-2 मधून वर्ग-1 करताना कोणताही नजराणा आकारला जाणार नाही, पण इतर भूमिहीनांना सरकारनं दिलेल्या जमिनी वर्ग-2 मधून वर्ग-1 करताना प्रचलित दरानुसार नजराणा आकारला जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलंय.


डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात याविषयी बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, “भोगवटादार वर्ग-2 मधून 1 करताना ज्या मूळ खंडकऱ्यांच्या जमिनी होत्या, त्यांना अधिमूल्य आकारायचं नाही. इनामाच्या ज्या जमिनी आहेत, त्यावर प्रचिलित कायद्यानुसार आकारणी करावी लागेल.”



, 2)

प्रचलित दरानुसार, नजराणा किती भरावा लागेल ...


कृषिक प्रयोजनसाठी जमीन प्रदान केलेली असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 50 % इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.

वाणिज्यिक अथवा औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्कानं किंवा भाडेपट्ट्यानं धारण केलेली असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 50 % इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.

रहिवासी वापरासाठी कब्जेहक्कानं धारण केलेली जमीन असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 15% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.

रहिवासी वापरासाठी पण भाडेपट्ट्यानं धारण केलेली जमीन असेल, तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 25% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी.



यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019 च्या या नियमानंतर, ज्या नागरिकांनी वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये रुपांतरित केल्यात त्यांना नजराणा भरण्यासाठी 7 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आधी ही मुदत मार्च 2022 पर्यंत होती.


कागदपत्रे कोणती लागणार?

वर्ग-2 च्या जमिनीचं 1 मध्ये रुपांतर करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागणार, ते जाणून घेण्यासाठी तुम्ही एकदा तहसील कार्यालयात जाऊन त्याबाबत विचारपूस करावी.


 कोणती कागदपत्रं लागतात ते पाहूया-


संबंधित जमिनीचे गेल्या 50 वर्षांतील सातबारा उतारे

या सातबारा उताऱ्यावरील सर्व फेरफार नोंदी

चतु:सीमा दाखवणारा नकाशा

आकरबंदाची मूळ प्रत

एकत्रीकरणाचा मूळ उतारा

मूळ धारकास जमीन कशी मिळाली त्याबाबत कबुलायत

तलाठी यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा

अर्ज केल्यानंतर पुढे काय कार्यवाही?

एकदा का अर्ज सादर केला की, किती नजराणा भरायचा त्याबाबतचं चलन तहसील कार्यालयाकडून अर्जदारास दिलं जातं. अर्जदारानं बँकेत ही रक्कम भरल्यास ते चलन आणि खरेदीची इतर कागदपत्रं पाहून तलाठी त्या व्यवहाराची गाव नमुना 6 मध्ये नोंद करतात.


पुढे मंडळ अधिकारी सर्व कागदपत्रं बघतात आणि मग त्या जमिनीवरील भोगवटादार वर्ग-2 हा शेरा कमी होऊन तिथं भोगवटादार वर्ग-1 हा शेरा लागतो.