मंगलवार, 13 अक्तूबर 2015

भारतीय खेड़े

भारतीय खेड़े

खेड़े म्हणजे विषमता
शतकांच्या कुडाच्या भिंती
शेतकऱ्यांना लावलेली मंदिराची पट्टी
दारिद्रयाचं कॉम्पिटिशन

खेड़े म्हणजे रस्त्यावर
अविद्येच्या विष्ठेचं साम्राज्य
खेड़े म्हणजे गोपनीय मतदानाला
उघडं करण्याचं ठिकाण

खेड़े म्हणजे फ़िल्टर वाटर च्या काळात
विहीरीचं पाणी पिणारे भारतीय बीमार

खेड़े म्हणजे बैलाना
नामर्द करण्याचे ठिकाण

खेड़े म्हणजे अन्नधान्याच्या
निर्मितीसाठी जुंपलेले गुलाम
          - चारागर (चारुशील माने)


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें